Germany India Driver Jobs

चालक आहात? खुशखबर, सरळ जर्मनीत मध्ये नोकरीची संधी-सर्व खर्च महाराष्ट्र सरकारच करणार!

सध्या जर्मन देशातील बाडेन युटेनबर्ग या राज्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आलेला असून ज्यामध्ये वाहनचालकांनी संधी आहे. जर्मनीस जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांनी शासनामार्फत जारी करण्यात आलेला QR Code स्कॅन करून प्रवेश अर्ज करावा, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे एक हेल्प डेस्क कक्षाची उभारणी करण्यात आली कार्यालयाच्या दर्शनी भागात माहिती पत्रक लावले आहे. हा करार करण्यात आल्यानंतर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेली क्षेत्रे निश्चित करणे, प्रत्यक्ष काम करण्यासाठी किमान कौशल्याची निश्चिती करणे, कुशल मनुष्यबळाच्या स्थानांतरणासाठी व्हिसा व रहिवास याबाबत धोरण निश्चिती, जर्मन भाषेचे व आवश्यक शिष्टाचाराचे प्रशिक्षण इत्यादी अनेक बाबतीत निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ दि.११.०६.२०२४ ते दि.१५.०६.२०२४ या कालावधीत बाडेन वुटेनबर्ग या राज्याच्या दौऱ्यावर होते.

Germany India Driver Jobs

अर्थात वर उल्लेख करण्यात आलेल्या सर्व बाबींसाठी काहीसा कालावधी लागणार आहे हे स्पष्ट आहे. तथापि, आरोग्य क्षेत्रासह परिवहन, विविध उद्योगातील तंत्रज्ञ इत्यादीसाठी कुशल मनुष्यबळाचा पुरवठा प्राधान्याने होणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पथदर्शी तत्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १०,००० कुशल मनुष्यबळ तातडीने त्याहा करार करण्यात आल्यानंतर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असलेली क्षेत्रे निश्चित करणे, प्रत्यक्ष काम करण्यासाठी किमान कौशल्याची निश्चिती करणे, कुशल मनुष्यबळाच्या स्थानांतरणासाठी व्हिसा व रहिवास याबाबत धोरण निश्चिती, जर्मन भाषेचे व आवश्यक शिष्टाचाराचे प्रशिक्षण इत्यादी अनेक बाबतीत निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित विभागातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ दि.११.०६.२०२४ ते दि.१५.०६.२०२४ या कालावधीत बाडेन वुटेनबर्ग या राज्याच्या दौऱ्यावर होते.

अर्थात वर उल्लेख करण्यात आलेल्या सर्व बाबींसाठी काहीसा कालावधी लागणार आहे हे स्पष्ट आहे. तथापि, आरोग्य क्षेत्रासह परिवहन, विविध उद्योगातील तंत्रज्ञ इत्यादीसाठी कुशल मनुष्यबळाचा पुरवठा प्राधान्याने होणे आवश्यक असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पथदर्शी तत्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान १०,००० कुशल मनुष्यबळ तातडीने त्या राज्यास उपलब्ध करुन द्यावे असे प्रस्तावित होते. या विभागामार्फत यापूर्वी उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायीकरण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात असे. या योजनेनुसार शिक्षणातून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय यासाठीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. प्रस्तावांतर्गत पथदर्शी प्रकल्पाचे उद्दिष्ट तशाच स्वरूपाचे असल्याने या योजनेचा विस्तार करून सदर पथदर्शी प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

राज्यास उपलब्ध करुन द्यावे असे प्रस्तावित होते. या विभागामार्फत यापूर्वी उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यावसायीकरण ही केंद्र पुरस्कृत योजना राबविली जात असे. या योजनेनुसार शिक्षणातून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योग व व्यवसाय यासाठीच्या संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले होते. प्रस्तावांतर्गत पथदर्शी प्रकल्पाचे उद्दिष्ट तशाच स्वरूपाचे असल्याने या योजनेचा विस्तार करून सदर पथदर्शी प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. ‘देशातील युवकांना परदेशात नोकरीसाठी पाठविताना काही वेळा संस्थांमार्फत त्यांची फसवणूक होत होती. मानवी तस्करीचाही प्रश्न निर्माण होत होता. मात्र, आता सरकारने जर्मनी देशातील बाडेन वुटेनबर्ग राज्यासोबत करार करून पुढाकार घेतल्याने युवकांमध्ये विश्वास निर्माण होणार आहे. परदेशातील महिलांकडून महिला गाइडची मागणी होत असून, या संधीचा लाभ घेऊन महिलांनी परदेशी भाषा शिकून गाइड होण्याची संधी मिळवावी. लंडन, चीन, युरोप आदींमध्ये भारतीय खाद्यपदार्थांविषयी उत्सुकता आहे. योग, आयुर्वेदाचीही मागणी आहे. त्यामुळे अनेक देशांना समोर ठेऊन कौशल्य विकासाचे काम करावे लागेल,’ असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुचविले.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *